पाऊस होता पण ती नाही
तिच्या आठवणीतला ओलावा ओसरत चाललाय काही..
पावसाच्या थेंबांमध्ये नटली होती पेनाची स्याही
तुझी आठवण पाहता मेघ थकले ग , पण मी नाही..
गार गार वारं अलगद स्पर्श करून जाई
जो गारवा तुझ्या ओठांमध्ये, तो निसर्गातही नाही ..
चहूबाजूस पाणीच पाणी , चिखलात खेळायची घाई
तुझ्या केसांचा तो सुगंध ओल्या मातीतही नाही ..
हळू हळू शरद, हेमंत व शिशिर ही निघून जाई
ऋतू बदलला कि पाऊस जातो, पण तुझ्या भेटीची ओढ नाही ..