मुंबई मेरी जाण,
देशाची आर्थिक खान,
बाळासाहेबांची ही निर्मिती,
मराठी माणसाची शान !
धावती फास्ट लोकल,
अन ह्यांचा कष्टाचा घाम,
जिथे लालबाग चा राजा,
ताठ राहते भक्तांची मान !
पुणे तिथे काय उणे,
पेशव्यानंचे हे स्थान म्हणे..
शिवरायांचे महाल इथे,
इथे टिळकांचा केसरी वाडा,
सिंहगडाच्या पायथ्याशी,
आठवतो मावळ्यांचा लढा !
शिक्षणाचे माहेरघर,
पवारांचा बाल किल्ला,
तडे गेलेत थोडे,
बांधताय कोल्हापूर चे पाटील,
एक ग्रँड भगवा Villa
स्वच्छ नासिक, सुंदर नासिक,
कॉलेज रोड चे आमचे आशिक..
श्री रामाने पंचवटी दिली,
पांडवांनी लेणी,
कुंभ मेळ्याने पवित्र,
धार्मिक गुरूंची ही देणी !
तोफ गोळ्यांच्या आवाजात,
सावरकरांच्या हिंदुत्वात,
न्हायलीय प्रजा सारी..
विसरून कसे चालेल,
राज साहेबांची ती सभा न्यारी !