go corona , corona go
देऊळ बंद , रुसवा सोड
विटेवरती पांडुरंगही उभा
आपले अस्तितव संपव, अहंकार मोड ,
गुणाकाराचा आता पाढा विसर ,
तो पहा बजरंगबली , आणली संजीवनीची खोड
go corona , corona go
go corona , corona go
युद्ध तुझे , कपट नीतीचे ,
लाल ड्रॅगन ची साथ घेऊन
आम्हालाच वेठीस धरले ,
ज्या शूरांनी आम्हास तारले ,
त्यालाच निर्दयतेने मारले
अदृश्य होऊन वावरलास तू ,
बनवले वातावरण भीतीचे ,
go बाबा , आता तरी लवकर corona go
go corona , corona go
पृथ्वी वरचा तुझा सहवास ,
काटे रुतण्याचाच एक भास ,
विसरला आहेस तू भूतकाळ,
विसरला आहेस इतिहास..
जंग हे तुझे , मी नाही सुरु केले
संपवणार मात्र मी ,
वाट बघते आहे तुझी, शास्त्रन्यांची लस!
go corona , corona go