कोमेजून सुरकुटलेलो आपण उरले सुरले काही
ध्यानी नाही ज्ञान , सुखली पेनचीही शाई
रोजचेच झाले आहे आज नवीन काही नाही
नौकरी मिळून तरी मुख दाखवायचेहे नाही
झोपेतच राहतो मी आता कुशीत
जागेपणी टेन्शन ने झाले स्पंदने भुसभुशीत
सांगायचे आहे ह्या कंपनी तुला
दमलेल्या fresher ची ही कहाणी तुला …!!!
सिंहगडाच्या कॅम्पसात गर्दी होती भारी
घामाघूम होऊन होती दिली interview सारी
रोज सकाळीस mail refresh करून बघे
आम्हा मेल पाठवायचे तुमचे राहुनिया गेले
बाकी सगळे employee ची कदर करी
आज तरी आम्हा मेल येणार का दारी
स्वप्नातल्या गावामध्ये आम्हा मारायचीय फेरी
खऱ्याखुऱ्या परीला अजून आणायचेय घरी
बांधीन मी थकलेल्या हातांनी झुला
दमलेल्या fresher ची ही कहाणी तुला …!!!
ऑफिसात असतो मित्र कामात बुडून
मिळतो दोन पैसा असतो पब मध्ये बसून
तास तास जातात आमचे खाल मानेने निघून
एक एक आशा जाते हळूच विझून
अश्या वेळी काय सांगू काय काय वाटे
डोळ्यासमोर रिकामेपणाचा अंधार दाटे
वाटते कि उठुनिया दुसऱ्या कंपनीत जावे
करावे ब मस जरा IAS व्हावे!!!
आल्या होत्या कंपन्या package होते सात
पण पहिलेच मिळाली होती ही कंपनी अन झाला होता घात
लुटूलुटू केली होती चाल टाकलं होतं पाऊल पहिलं
दूरच पाहत राहिलो फक्त जवळ पाहायचंच राहिलं!!!
असे गेलो आहोत आपण पूर्ण अडकून
हल्ली झोप लागत नाही निघून जाते पूर्ण noon
अशी कशी कंपनी ही देव लेकरांना देतो
मिळतो कमी पगार मेल पण उशिरानं येतो
fresher चे ही वर्ष जाताय हातातून निसटून
रोजगार मिळतो आहे आता फक्त शेतीतून
तुझ्या जगातुन आम्ही हरवून जाऊ का गं ?
काही वर्षांनी तू पर्वा करशील का गं ?
जाता जाता भरमसाठ profit कमावतांना तू सारे
येईल का आमच्या increment ची आठवण बरे !!!