आठवते का तुला सये आपण भेटलो होतो,
जास्वंदाच्या रंगाने तू रंगली होतीस,
परके डोळे काही जुळत नव्हते,
संस्कृती ने जोडलो होतो पण शब्द काही पोहचत नव्हते
आठवते का तुला…
आठवते का तुला सये आपण भेटलो होतो,
‘चोरी चोरी चुपके चुपके से’ तुझा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे होता,
लाजाळूच्या पानांसारखी हळू हळू फुलत होतीस,
जणू बाप्पा माझ्या काळजाला नवीन मैत्रीण देत होता
आठवते का तुला…
आठवते का तुला सये आपण भेटलो होतो,
‘friendship day’ च्या शुभ मुहूर्तावर भेटलो होतो,
हळू हळू गप्पा रंगत चालल्या होत्या ,
अन गोड़ व्यक्तीचा मधुर आवाज अलगद कानावर पडत होता
आठवते का तुला…
आठवते का तुला सये आपण भेटलो होतो,
जगातले आठवे आश्चर्य घडले होते ,
म्हणता म्हणता कॉफी शॉप च्या उंबरठ्यावर दोघं उभे होतो,
हे स्वप्न नव्हे सत्य होते ,
अनपेक्षित माझे कॉफी ‘proposal’ तू मानले होते
आठवते का तुला…
आठवते का तुला सये आपण भेटलो होतो,
हळू हळू वेळ गेला तसे आपले नाते घट्ट झाले होते,
जुळले होते तार पूर्णपणे,
कारण तुला ‘impress’ करायचे कोडे मी शोधले होते ,
आठवते का तुला…