माझ्या कुशीत नाही तीच का आठवते मला
माझ्या स्वप्नात जी तीच भासते पुन्हा
भूतकाळाने भविष्यकाळावर मात केलेली
पण तुझा अबोला पाहता मीच विचारतो तुला-
‘सांग ना .. भेटशील का पुन्हा ?’
तुझे होते प्रेम माझा नाद खुळा
तो प्रवास भले लहान पण आठवतो पुन्हा
निशब्द होऊन शब्दाला शब्द जोडायचो
पण तुझ्या स्मरणात नाही ते कळते मला
‘सांग ना .. भेटशील का पुन्हा ?’
आज कोडे असे – मी इथे मग तू तिथे कशाला ?
तुझ्यात तू अन माझ्यात मी दडलेला
कितीदा नव्याने पाऊल टाकायचे पुन्हा
जे तुझ्यात होते .. ते नाही कोणात
‘सांग ना भेटशील का पुन्हा ?’
थोडे थोडे अंतर , हळू हळू वेळ गेला
सागर ओलांडून गेलीस पण मी वाट पाहतो पुन्हा
गोदा काठे नाही तर थेम्स नदीचा किनारा ही बरा
एका हाकेच्या अंतरास सापडेल मी तुला
फक्त एकदा म्हणून पहा –
‘सांग ना .. भेटशील का पुन्हा ?’