एक पेग पिला
अन गार गार झालो ,
तू आणलीस ४०० ची बकार्डी
अजून घोडेस्वार नाही झालो ,
एक एक थेंब कसा काचेला धरून बसलेला,
घसा ओला झाला
पण जीभ काही सरकेना ..!
दुसरा पेग पिला
अन भेटावेसे वाटले तिला,
यार बैठे है सामने
पर उसके सीवा थोडी ना सुकून मिला,
हळू हळू चढत होती, ४०० ची ३०० झाली,
तुमच्या चालू द्या गप्पा
कारण आपल्या डोक्यात रंगलीय वेगळीच कव्वाली !
तिसरा पेग पिला
अन अंगात संचारला पेशवा,
झुलत होते झुंबर
पर यार तू एक और पेग ला…
उसके बाद कितना पिया कुछ याद तो नही
तुने थोडा कम,
मैने ज्यादा कम नही !!!