प्रभाव ..
एक असा प्रत्यक्ष शब्द ज्याने मिळतो व्यक्तीस भाव
जो वर असतो विज्ञानात तो वर मिळते शिकण्यास वाव
ज्योतिषीत घुसला कि काही खरं नाही तुमचं राव
अन माणसात घुसला कि बदलून टाकतो इतर व्यक्तींप्रती त्याचा स्वभाव !!!
प्रभाव ..
आधी तर कधी ऐकले नव्हते असले नाव
गुरुत्वाकर्षण आलं अन सुरु झाला अभ्यासात सराव
काय तर म्हणे पडलेल्या सफरचंदावर ह्याच गोष्टीचा तर होता प्रभाव …
प्रभाव ..
ह्या एका शब्दावर तर हजारो लग्न मोडली
ग्रहतारांच्या प्रभावाखालीच तर लोकांची विचारसरणी मेली
हाच तो प्रभाव ज्यामुळे नावांपुढे अक्षरं लागली ..
कोणी सुरुवातीला लावली कोणी पिछाडीस लावली …
प्रभाव ..
कधी कधी हा देतो खूप कटू अनुभव
एका व्यक्तीचा वाढल्यास दुसऱ्याचा नाहीसा करतो हा प्रभाव
जणू ‘conservation of energy ‘ चा कायदाच ना भाऊ
पुस्तकात असतो तो वर जाणवत नाही ह्याचा भाव
डोळ्यांदेखत व्यक्ती बदलत जातात …
तेव्हा जाणवतो तुटवडा -तोच तो असतो कमी झालेला आपला तो प्रभाव !