तू भेटायला हवे

कधी तरी तू भेटायला हवे
अलगद पणे माझ्या खांद्यावर निजावे
मी दिवसा बघतो ते तू निजल्यावर तरी पहावे
स्वप्न असे कि प्रत्येक क्षणी तुझाच भास व्हावे !

कधी तरी तू भेटायला हवे
माझ्या खुशीत तुझे मस्तक जणू फुलपाखरू वाटावे
उद्या तू दुसऱ्या फुलावर ही बसशील
पण देवा मला पुढच्या जन्मी तरी गुलाब बनवावे !

कधी तरी तू भेटायला हवे
तुझ्या नाजूक ओठांचा स्पर्श करता यावे
हळू हळू स्पर्श , हळू हळू पापण्या मिटावे
तुझ्यात मी अन माझ्यात तू इतके विलीन होऊ ,
कि तुझे गुलाबी ओठ माझेच व्हावे !

कधी तरी तू भेटायला हवे
तुझ्याशी नाते वॅलेंटाईन्स पूर्ती नाही , आयुष्यभर जुळावे
जुळता जुळता मने इतकी जुळावे ,कि तू देखील म्हणशील मला –
‘आता खरंच आपण भेटायला हवे !’

Published by अखिलेश कुलकर्णी

मराठी व इंग्रजी साहित्याला जोपासणारा एक कोवळा लेखक व कवी .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: