तू जाशील California ला अन माझ्या मनाचं Bangalore करून जाशील ..
वचन दे कि ह्या काळात ही
मज नाही विसरशील
अजूनही ह्या Variable ला declare करतांना
public च्या ऐवजी friend class मध्येच करशील
वचन दे कि ह्या काळात ही
networking मधल्या माझ्या port ला connection देशील
मी तर तुला miss करेल शंकाच नाही ,
तू पण तुझे packets miss नाही होणार ह्याची काळजी घेशील
वचन दे कि ह्या काळात ही
तू अशी query लिहशील
select * from people सोबत
where name = ‘अखिलेश’ AND location = ‘नाशिक रोड’ ची condition देशील
वचन दे कि ह्या काळातही
अजिबात न बदलता आत्ता सारखीच राहशील
मी regression testing केल्यास
मला successful results देशील
वचन दे कि ह्या काळातही
माझ्या component साठी listener method लिहशील
WindowListener ने मज close करण्यापेक्षा
WindowActivated ची method लिहशील
वचन दे कि ह्या काळातही
तू MS Excel सारखी ‘simple’ राहशील
तुझे cursor चोहीबाजुंना फिरणार आहे
फक्त नेहमी Project report वरची smiley बनून राहशील !