अजून तरी तों दिवस विसरू शकत नाही ..
एकाच बाकावर भेटलो ,ती भेट होती शाही
आपले सम गुण पाहुणी प्रतिबिंब हि लाजले
म्हणुनी तुम्ही तर एकाच नाण्याचे दोन भाग
मी काही तुमच्या शर्यतीत नाही!!!
अजून तरी तों दिवस विसरू शकत नाही ..
कशी दोन तब्ल्यांनी लय पकडली कळलेच नाही
मी होतो घट्टा तू त्याच तबल्याची स्याही
काळासोबत भले बदलले तुझे वाद्य , पण माझी साथ नाही
तू वाजवशील भैरवी आता तरी तीनताला शिवाय जुगलबंदी परिपक्व नाही !!!
अजून तरी तों दिवस विसरू शकत नाही ..
सुरांसोबत शब्दांचीही मैफिल सुरु झाली
तुझी आहे कळी अन मज पाकळी मिळाली
शब्दाला शब्द जोडत गेलो ..
आता तूच रे संदीप, मज सलीलची उपमा मिळाली
चल मित्रा आता आलीच आहे वेळ तर आयुष्यावर बोलू काही !!!!
अजून तरी तों दिवस विसरू शकत नाही ..
ऊन सावलीच्या खेळामध्ये सोबत पुस्तके हि धरली
टिपुक टिपुक थेम्बांखाली गरम नेसले मॅग्गी खाल्ली
गोड गुलाबी थंडीत प्रीय्सिंची सोबत आठवण काढली
खांद्याला खांदा लावून हि दोस्ती पुढे नेली !!!बहुतेक मित्रच एवढे खास असतात काही कि शोधून हि लवकर सापडत नाही ..
अजून तरी तो दिवस विसरू शकत नाही !!!!!!!!!